दिवाळी विषयी माहिती
दिवाळी हा भारतामधील सर्वात मोठा आणि आनंदाचा सण मानला जातो. ह्याला दीपावली असेही म्हटले जाते. दीपावली म्हणजे दीपांची माळ. अंधारावर प्रकाशाचा विजय आणि वाईटावर चांगुलपणाचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. ह्या सणाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व खूप आहे. दिवाळी मुख्यतः कार्तिक महिन्यात येते आणि पाच दिवस साजरी केली जाते.
दिवाळीचा इतिहास आणि धार्मिक कथा
दिवाळी साजरी करण्यामागे अनेक धार्मिक कथा सांगितल्या जातात. सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे भगवान रामचंद्रजींची अयोध्येतील पुनरागमन. चौदा वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणाचा पराभव करून भगवान राम, सीता माता आणि लक्ष्मण घरी परतले, तेव्हा
अयोध्यावासीयांनी त्यांच्या स्वागतासाठी दिवे लावले आणि नगरी उजळून टाकली. तेव्हापासून दिवाळी साजरी केली जाते , information of diwali in marathi.
काही लोकांच्या मते, ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून साठ हजार स्त्रियांना मुक्त केले होते. तर काही कथा वामन अवतार, समुद्र मंथनातून लक्ष्मीदेवीचा जन्म, यांच्याशी जोडलेल्या आहेत.
विविध धार्मिक कार्यक्रम, देवता आणि व्यक्तिमत्त्वांशी दिवाळी जोडलेली आहे, जसे की राक्षस राजा रावणाचा पराभव करून राम आपली पत्नी सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्यासह अयोध्येत परतले. समृद्धीची देवी लक्ष्मी आणि बुद्धीची देवता आणि अडथळे दूर करणारा देव गणेश यांच्याशी देखील व्यापकपणे हा सण संबंधित आहे. इतर प्रादेशिक परंपरा या सणाला विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी, किंवा विश्वकर्मा यांच्याशी जोडतात. प्रामुख्याने हिंदू सण असला तरी दिवाळीचे विविध प्रकार इतर धर्मांचे लोक देखील साजरे करतात.जैन लोक त्यांची स्वतःची दिवाळी पाळतात, जी महावीरांच्या अंतिम मुक्तिचे प्रतीक आहे.[११][१२] मुघल तुरुंगातून गुरू हरगोबिंद यांची सुटका झाल्याबद्दल शीख लोक बंदिछोर दिवस साजरा करतात. नेवार बौद्ध हे इतर बौद्धांच्या विपरीत लक्ष्मीची पूजा करून दिवाळी साजरी करतात, तर पूर्व भारत आणि बांगलादेशातील हिंदू सामान्यतः देवी कालीची पूजा करून दिवाळी साजरी करतात.
प्राचीनत्व
या सणाचा उगम फार प्राचीन काळी, आर्यांचे वास्तव्य उत्तर ध्रुव प्रदेशात होते, त्या काळातच झाला असा समज आहे. तथापि वैदिक काळात आश्विन महिन्यात शरद ऋतूचे औचित्य साधून आश्वयुजी किंवा आग्रयण यासारखे यज्ञ केले जात असत, ज्यांचा समावेश सात पाकयज्ञांमध्ये होतो. परंतु या धार्मिक आचारात दिवाळीचे प्राचीन संदर्भ सापडतात, असे नेमके म्हणता येतेच असे नाही, असे मत बी.के. गुप्ते यांनी आपल्या फोकलोअर ऑफ दिवाली या पुस्तकात मांडले आहे. काही लोकांची अशी श्रद्धा आहे की चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले. तो याच दिवसात.[३५] पण त्यावेळी त्याचे स्वरूप आजच्यापेक्षा खूपच भिन्न होते. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. पावसाळ्यातील समृद्धीच्या, आनंद उत्सवाचा, कृतज्ञतेचा हा सोहळा मानला जातो. या दिवसांत सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात, घरांच्या दारात आकाशदिवे
लावले जातात. महाराष्ट्रात व इतर ठिकाणी लहान मुले या काळात मातीचा किल्ला तयार करतात. त्यावर मातीची खेळणी मांडतात. धान्य पेरतात. यामागची परंपरा कशी व केव्हा सुरू झाली याची नोंद नाही.
दिवाळीचे पाच दिवस
दिवाळी हा एक दिवसाचा सण नसून, पाच दिवस साजरा केला जातो. हे पाच दिवस असे:
- वसुबारस - ह्या दिवशी गाई-वासरांची पूजा केली जाते.
- धनत्रयोदशी – ह्या दिवशी धन्वंतरीदेवांची पूजा केली जाते. आरोग्यासाठी आणि धनसंपत्तीच्या वृद्धीसाठी ह्या दिवशी खरेदी करण्याची प्रथा आहे.
- नरक चतुर्दशी (कळवंत) – ह्या दिवशी अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. अंघोळीनंतर नवीन कपडे घालून सुगंधी उटणे लावतात.
- लक्ष्मीपूजन – दिवाळीचा मुख्य दिवस. ह्या दिवशी घरात लक्ष्मीदेवीचे पूजन करून समीद्धीसाठी केली जाध्र्ध्थना केली. संध्याकाळी घरोघरी दिवे लावले जातात, फटाके वाजवले जातात.
- भाऊबीज – ह्या दिवशी बहिण भावाला ओवाळून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. भावंडांच्या प्रेमाचे हे प्रतीक मानले जाते.
दिवाळीची सजावट आणि गोडधोड
दिवाळीत घराची स्वच्छता करून ती रंगवली जाते. दरवाज्याला तोरण, आकाशकंदील, रांगोळी, आणि दिवे लावले जातात. ह्या सणात विविध प्रकारचे फराळाचे पदार्थ बनवले जातात. लाडू, चिवडा, करंजी, चकली, शंकरपाळे हे विशेष पारंपरिक पदार्थ घराघरांत तयार केले जातात.
दिवाळीचा सामाजिक महत्त्व
दिवाळीचा सण हा केवळ धार्मिक सण नसून, सामाजिक आणि कुटुंबाचा बंध मजबूत करणारा सण आहे. दिवाळीच्या निमित्ताने सगळे नातेवाईक, मित्र-परिवार एकत्र येतात. एकमेकांना शुभेच्छा देतात, गोडधोड खातात, आणि आनंद साजरा करतात.
यासोबतच दिवाळीचा सण आर्थिकदृष्ट्या देखील महत्त्वाचा मानला जातो. ह्या सणात नवीन कपडे, दागिने, घरगुती वस्तू, फटाके यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते.
भारतातील विविध समाजांची दिवाळी
- जैन समाज : आश्विन अमावास्येला जैनांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजळतात आणि त्यांना 'निर्वाण लाडूं'चा भोग चढवतात. आणि नंतर फटाक्यांची आतशबाजी करतात.
- आंध्रातील तेलुगू समाज : ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंबा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात, मग दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात.
- बंगाली समाज : दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीबाड्यांत जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरांत दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन पंधरा दिवस आधी, म्हणजे शरद पैर्णिमेलाच झालेले असते.
- बौद्ध समाज : गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.
- तमिळ समाज : प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात.
- महाराष्ट्रातील मराठी समाज : लक्ष्मी पूजन सोडले तर मराठी लोकांच्या दिवाळी कुठलाही धार्मिक विधी नाही. खाणे-पिणे सणांचा आनंद लुटणे, मित्र-मैत्रिणींच्या, आप्तांच्या भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्यांची आतशबाजी करणे ही यांची दिवाळी. ती रमा एकादशीपासून (आश्विन कृष्ण एकादशीपासून) सुरू होते. त्या रात्री फक्त तुळशीपुढे तेल-वात घालून उजळवलेली पणती ठेवतात. दुसरा दिवस वसू बारस. या दिवसापासून रोज भरपूर पणत्या लावून विजेच्या दिव्यांची रोषणाई करतात. घराबाहेर रांगोळी काढतात. आकाशकंदील लावतात. घरात गवारीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत असतो. तिसरा दिवस धन त्रयोदशी. ज्या बायकांनी आधीपासूनच दिवाळीचा फराळ, म्हणजे लाडू, करंज्या, शंकरपाळी, कडबोळी, शेव-चकली-चिवडा करायला सुरुवात केली नसेल तर ती करून काम लवकरात लवकर संपवतात. ज्या घरात फार माणसे असतील त्या घरातील स्त्रिया या दिवशी 'बायकांची न्हाणी' उरकून घेतात. चौथा दिवस - नरक चतुर्दशी. अगदी पहाटे उठून आधल्या दिवशी स्वच्छ केलेल्या संडासात पणती ठेवतात. पहाटेच घराबाहेर पणत्या ठेवतात आणि रोषणाई करतात. घरातील लोकांचे, विशेषतः पुरुषांचे, सूर्योदयापूर्वीच तेल उटणे लावून अभ्यंगस्नान होते. लोक आंघोळ करत असताना फुलबाज्या लावतात आणि फटाके फोडतात. नंतर सर्वजण फोडणीचे किंवा दडपे पोहे खातात. दिवाळीचा फराळ खाणे येता जाता चालूच असते. शेजारा-पाजाऱ्यांना फराळाची ताटे पाठवतात. त्यांच्याकडूनही ताटे येतात. ज्यांच्या घरात काही अशुभ घडल्याने दिवाळी नसते त्यांना आवर्जून फराळाचे जिन्नस आणि मुलांसाठी फटाके पाठवतात. पुढचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीची साग्रसंगीत पूजा होते. ही पूजा घरातला कर्ता पुरुष करतो. लक्ष्मीच्या मूर्तीशेजारी, काही दागिने आणि बंदे रुपये ठेवतात. त्यांचीही पूजा होते. प्रसादासाठी लाह्या-बत्तासे-डाळिंबाचे दाणे एकत्र करून एका तबकात ठेवलेले असतात. घरात या दिवसासाठी मुद्दाम केलेले अनरसेही ठेवतात. पूजेनंतर प्रसाद वाटतात व खातात. पुढचा दिवस दिवाळीच्या पाडव्याचा. जेवणाचा बेत श्रीखंडपुरी, उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी. या दिवशी स्त्रिया नवरा, दीर, सासरे आदींना ओवाळतात. नंतरचा दिवस भाऊबीजेचा. यासाठी भाऊ बहिणींच्या घरी जाऊन फराळ करतात किंवा जेवतात आणि ओवाळून घेतात. घराबाहेर पणत्या लावायचा आणि फटाके उडवण्याचा हा दिवाळीतला शेवटचा दिवस. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा एकदा छोट्या प्रमाणात रोषणाई करून घरातले उरलेसुरले फटाके फोडून संपवतात. दिवाळीत बनवलेले व न संपलेले फराळाचे जिन्नस पुढच्या दिवसांत खाऊन संपवतात.
निष्कर्ष
दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे. तो आपल्याला चांगुलपणाचा मार्ग अनुसरण्याचा, एकत्र येण्याचा आणि एकमेकांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा संदेश देतो. प्रत्येकाने हा सण आनंदी, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करावा.